कोरोनाचा चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक

नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा ।  कोरोनाचा चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक  पहायला मिळत आहे. चीनमध्ये दररोज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील अनेक भागांत पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात झाली आहे. कोट्यवधी नागरिक लॉकडाऊनमध्ये असून त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जगभरातील अनेक देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता आशिया खंडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. खबरदारी न घेतल्यास जगभरात कोरोनाचा उद्रेक होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाची नवी लाट पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने तसेच इतरही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

चीनमध्ये रविवारी 3400 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यापैकी 1800 जणांना लक्षणे होती. यामुळे चीनमधील शेनझेन येथील 1.75 कोटी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर आता आलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये 5280 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

चीनमधील जिलिन शहरात यापूर्वी लॉकडाऊन लावण्यात आला होता. तर शेजारील राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. जिलिनला लागून असलेल्या यांजीची सीमा उत्तर कोरियाला लागून आहे. या ठिकाणी एकूण सात लाख नागरिक राहतात. त्यामुळे येथे अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

 

Protected Content