मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेत भोटी येथील जिल्हा परिषद उच्च्ा प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. पारितोषिकेच्या सन्मानपत्रासह शाळेला अकरा लाख रूपयाची रक्कम ही प्राप्त झाली.
हे पारितोषिक शाळेचे मुख्याध्यापक राठोड सरांनी स्वीकारले. त्यांनी शाळेला मिळालेल्या पारितोषिकाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ज्यांनी हा उपक्रम राबविला ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकात पाटील यांचे सुध्दा आभार मानले. या पुरस्काराचे खरे मानकरी माझी शाळा माझे शिक्षक माझे विद्यार्थी आहे. यापुढे सुद्धा माझी शाळा ही शैक्षणिक दृष्ट्या वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी व गावकऱ्यांच्या पालकांच्या सहकार्यातून राज्यस्तरावर सुद्धा पुढील शैक्षणिक वर्षात भाग घेऊन प्रथम क्रमांक येण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहतील अशी आम्हा सर्व भोटा वासियांना अपेक्षा व आशा आहे यासाठी सुद्धा सर्व शिक्षक त्यांच्या सहकाऱ्यांना विद्यार्थ्यांना मनःपूर्वक असे मुख्याध्यापक राठोड सर म्हणाले. यावेळी सर्व विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते