यावल महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन कार्यक्रम

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा म. वि .प्र .सहकारी समाज संचलित कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी विभागातर्फे उपप्राचार्य प्रा . एम .डी. खैरनार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा .ए .पी. पाटील यांनी भूषविले. प्रा .खैरनार यांनी वाचनातून व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अब्दुल कलाम यांचे विविध विषयाच्या वाचनातून समृद्ध व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले हे सोदाहरण सांगितले तसेच विविध विषयावरील पुस्तके वाचून व्यक्तिमत्व विकास करण्याचे आवाहन केले .प्रा ए .पी .पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात प्रतिपादन केले की आधुनिक काळात वाचन करण्यासाठी डिजिटल ग्रंथालय उपलब्ध आहे. त्याचा योग्य तो वापर करून ज्ञानवंत बना. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पी .व्ही .पावरा ,प्रसाद मोरे, धम्मपाल भालेराव यांनी सहकार्य केले कार्यक्रमास कनिष्ठ विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content