उदया यावल महाविद्यालयास नॅक समिती देणार भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात गुणवत्ता वाढीसाठी नॅक पुनर्मूल्यांकन होत असून उद्या ११ मार्च रोजी सोमवार रोजी नॅक समिती भेट देणार आहे.

तरी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व पालकांशी नॅक समिती आपल्याशी संवाद साधणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्याच दिवशी दुपारी ३ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील प्रा.एम.डी. खैरनार आयक्यूएसी समन्वयक डॉ. हेमंत भंगाळे यांनी केले आहे.

Protected Content