यावलमध्ये युवा सेनेची बैठक : पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे यांनी आज यावलला भेट दिली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

पवन भोळे यांनी यावल तालुक्यातील विविध सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची माहिती जाणून घेतली. आगामी काळात होणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबद्दल या भेटीदरम्यान औपचारिक चर्चा झाली.

यावेळी युवा सेना यावल तालुका प्रमुख अजय तायडे यांनी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे यांचे स्वागत केले. बैठकीत यावल शहर आणि तालुक्यात शिवसेना व युवा सेनेची ताकद अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला. “आपला पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो, त्यामुळे त्याची ताकद अजून वाढवावी आणि जास्तीत जास्त युवकांनी पक्षात प्रवेश करावा यासाठी प्रयत्न करावेत,” अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

या बैठकीला शिवसेना यावल तालुकाध्यक्ष राजू काठोके, शिवसेना उपशहराध्यक्ष चेतन सपकाळे, शिवसेना उपशहराध्यक्ष राजू सपकाळे, शाखाध्यक्ष नाना महाजन, किशोर कपले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.