पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक आठमध्ये बांधकाम कामगारांसाठी जनसेवक बंडू केशव सोनार यांच्या पुढाकाराने एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर २२ ते २७ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
या शिबिरात एच. एल. एल. व हिंद लॅबच्या वतीने कर्मचारी अमित वाणी आणि फिरोज शेख यांनी बांधकाम कामगारांची रक्त तपासणी केली. शिबिरात ऑनलाइन रजिस्ट्रेशन, वजन, शुगर, बीपी तपासणी, डोळ्यांची तपासणी, फुफ्फुस तपासणी आणि उंची तपासणी अशा विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येत आहेत.
या शिबिरात एका दिवसाला ३५ सदस्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आमदार किशोर पाटील आणि जनसेवक बंडू सोनार यांनी पाचोरा शहरातील व प्रभागातील सर्व बांधकाम कामगार बंधू-भगिनींना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी बंडू सोनार यांच्याशी ९१५८५०९३१८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाबद्दल जनतेने आमदार किशोर पाटील आणि बंडू सोनार यांचे आभार मानले आहेत.