मु.जे. महाविद्यालयात योग दिनानिमित्त कार्यक्रम

yoga day m j college

जळगाव प्रतिनिधी । जागतिक योग दिनानिमित्त येथील मु.जे. महाविद्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मूळजी जेठा महाविद्यालय मध्ये पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सकाळी सात वाजता ओमकार पूजनान व दिपप्रज्वलन सुरुवात करण्यात आली. ओंकार प्रार्थना आणि गुरूवंदना रत्नप्रभा चौधरी यांनी केले. यावेळी ओरीयन स्टेट बोर्ड, ओरियन सिबीईएस इंग्लिश मिडीयम स्कूल व ए.टी. झांबरे विद्यालयाचे विद्यार्थीनी यांनी विविध आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डी. टी. पाटील (सदस्य के. सी. ई. सोसायटी), अध्यक्ष – प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी (प्राचार्य, मू. जे. स्वायत्त महाविद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन ही केले. कार्यक्रमाला शशीकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी, के. सी. ई.), डॉ. डी. जी. इंडियाले (शिक्षण संचालक, के. सी. ई. सोसायटी), के. जी. फेगडे (शालेय शिक्षण संचालक, के. सी. ई. सोसायटी), सुषमा कंची ( प्राचार्या, ओरीयन सीबीएसई स्कूल), डी. व्हि. चौधरी ( मुख्याधापक, ए. टी. झांबरे माध्य. विद्यालय), संदिप साठे (प्राचार्य स्टेट बोर्ड स्कूल) त्याचबरोबर प्रा. ज्योती वाघ, योगशिक्षिका रत्नप्रभा चौधरी व इतर शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन प्रा.देवानंद सोनार यांनी केले.

Protected Content