देशभरात योग दिनाचा उत्साह : पंतप्रधानांसोबत मान्यवर सहभागी

narendra modi yoga

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जागतिक योग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर यात सहभागी झाले आहेत.

आज सर्वत्र पाचवा जागतिक योग दिवस साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथील तारा मैदानावरील कार्यक्रमाच जाहीर योगासने केली. या कार्यक्रमात सुमारे ४० हजार नागरिक सहभागी झाले होते. याशिवाय, केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रोहतक येथे, स्मृती इराणी यांनी दिल्लीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथील कार्यक्रमात भाग घेतला. नांदेड येथे योगगुरू बाबा रामदेव यांच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!