एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल ऑनलाईन पध्दतीने आज जाहीर झाला. यात एरंडोल तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला असून यंदा देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे.
ग्रामीण उन्नती माध्यमीक विद्या मंदिर या शाळेच्या निकाल 100 टक्के लागला असून राधिका पाटील 90% प्रथम, अर्चना पाटील 85.60%,द्वितीय, मोहिनी पाटील 85% तृतीय क्रमांक मिळविला असून संस्था अध्यक्ष सचिन विसपुते यांनी अभिनंदन केले.
एरंडोल येथील रा.ती.काबरे विद्यालयाचा निकाल एकूण ८२.८० % लागला असून विद्यालयातून एकूण २५२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले करुतिका अनिल शिंदे ही ८९.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. मुलां मध्ये अनुश सुनील राठी याने ८८% गुण मिळवून प्रथम आला. महात्मा फुले हायस्कूल चा निकाल ८३.८७% लागला असून ममता शांतीलाल सुराणा हि ७५% गुण मिळवून पहिली आली. माध्यमिक विद्यालय भातखेडेचा निकाल ९६.१५% लागला. उर्वशी दीपक बडगुजर ८७.८०% गुण मिळवून पहिली आली.जे.जे. जाजू हायस्कूल उत्राण चा एकूण निकाल ९२% लागला असून देशमुख रुमान शफीक ८२.५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.