धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षपदी संजय गरूड

शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |जामनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लि.शेंदुर्णी या संस्थेची ३१ डिसेंबर २०२३ रोजी २०२३ ते २०२८ या कार्यकाळासाठी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय गरूड यांच्या नेतृत्वाखाली आचार्य विद्या विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे.

आज १२ जानेवारी रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जामनेर येथील सहकार अधिकारी एस. एस.पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष संजय भास्करराव गरूड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी लोहारा येथील भीमराव शामराव शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेसाठी नवनिर्वाचित संचालक संजय भास्करराव गरूड, भीमराव शेळके, रघुनाथ पाटील, सागरमल मिश्रीलाल जैन, किशोर पाटील, उत्तंमसिंग पाटील, राजेंद्र शेळके, उज्वला काशीद, विजय गरूड इत्यादी संचालक उपस्थित होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय गरूड, उपाध्यक्ष भीमराव शेळके यांचा नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अजित वाघ,  प्रवीण गरूड, चंद्रशेखर पाटील, दिनेश पाटील, डॉ. देवेंद्र शेळके लोहारा, नंदकिशोर बारी, प्रकाश देशमुख, विलास अहिरे, विजय गरूड, रघुनाथ राठोड, विनोद राठोड, स्नेहदीप गरूड,  राहुल गरूड, शिवराज गरूड, साई गरूड, प्रा. डॉ. श्याम साळुंखे, मावळते सचिव सतिश काशीद यांनी सत्कार केला. संस्थेच्या उज्वल परंपरा व आदर्श जपत विकास साधला जाणार असल्याचे अध्यक्ष संजय गरूड यांनी सांगितले.

Protected Content