हिट अँड रन कायदयाविरोधात ओन्ली ड्रायव्हर मदत संघटनेतर्फे आमरण उपोषण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने नुकताच हिट अँड रन कायदा लागू केला असून या कायद्यांतर्गत लावण्यात आलेले कठोर नियम रस्त्यावर चालणाऱ्या चालकांच्या जिव्हारी लागणारे असून लागु करण्यात आलेला हिट अँड रन चा काळा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा. या मागणीसाठी १२ जानेवारी पासून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष मोहन भिका चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या आमरण उपोषणास्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनने अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे. या आमरण उपोषणात ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

केंद्र सरकारने नुकताच हिट अँड रन कायद्या लागु केला असून या कायद्यांतर्गत एखादा अपघात झाल्यास घटनास्थळा वरुन पलायन करणाऱ्या ड्रायव्हरला १० वर्षांची शिक्षा व ७ लाख रुपये दंडाची शिक्षा होणार असल्याने हा निर्णय ड्रायव्हरांना मान्य नसून या निर्णयाच्या निषेधार्थ सर्वत्र रास्ता रोको, स्टेअरिंग छोडो आंदोलन, आमरण उपोषण केली जात आहे. या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ १२ जानेवारी पासून ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेने पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Protected Content