आमदारांना विकासनिधीच्या गंगाजळीत कोटींची वाढ – – अजित पवारांची घोषणा

मुंबई- लाइव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघात कोविडकाळात थांबलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीत आणखी एक कोटींची भरघोस वाढ केली आहे. राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात घोषणा केली.

त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी उपलब्ध होणार असून आमदारांचे ड्रायव्हर आणि पीएच्या पगारातही पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

राज्यातील आमदारांच्या निधीत एक कोटीची घसघशीत वाढ करण्यात आली असून चार कोटी असलेला आमदारांचा स्थानिक विकास निधी आता पाच कोटी रुपये असणार आहे. तर आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यांत आला आहे.

विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना हा निधी मिळणार असून या नव्या निर्णयानुसार आता आमदारांना या निधीतून आपल्या मतदारसंघातील विकासाची कामं करता येणार आहेत. आहे. विधानसभेतील आमदारांची संख्या २८८ तर विधानपरिषदेचे ७८ आमदार आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीमध्ये  दोन वर्ष वाढ  केली नव्हती. त्यानंतर आज दोन वर्षानंतर आमदार निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे.

Protected Content