कासमवाडी येथे जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करणार्‍या संशयिताला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कासमवाडी येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूहल्ला करून फरार असलेल्या संशयितालाएमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

 

रोहित उत्तम भालेराव रा. कासमवाडी जळगाव असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, कासमवाडी येथे जुन्या वादातून प्रशांत गोपाल चौधरी या तरूणावर रोहित भालेराव यांच्यासह तीन ते चार जणांनी चाकू हल्ला केला होता. याप्रकरणी प्रशांत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सुनील रसाल राठोड ,अनिल राठोड, अमन चंद्रकांत सोनवणे यांना अटक करण्यात आली होती तर रोहित भालेराव फरार होता. फरार असलेल्या रोहित बाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी सुनील सोनार सुधीर साळवे किशोर पाटील मुकेश पाटील मुदत सरकारची यांनी संशयित रोहित यास बुधवारी तुकारामवाडी येथून अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश ए.एस. शेख यांनी कारागृहात रवानगी केली आहे. सरकारतर्फे अॅड एम.सुरळकर यांनी काम पाहिले.

Protected Content