चाळीसगावात मुलींनी पुन्हा मारली बाजी!

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दहावी परिक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता प्रसिद्ध करण्यात आला. यात बारावीनंतर मुलींनी पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेत बाजी मारली असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी तालुक्याचा निकाल एकूण ९४.९८ टक्के एवढा लागला आहे.

विद्यार्थ्यांना उस्तुकता लागून असलेल्या दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवार, दि.१७ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. यात ९५.४० टक्के एवढा निकाल मुलींचा लागला आहे. त्यामुळे बारावी परिक्षेनंतर मुलींनी पुन्हा एकदा दहावी परिक्षेत बाजी मारल्याचे निकालातून समोर आला आहे.

तालुक्यातून एकूण ६,१६१ एवढे विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी मुलांची ३,५७० तर मुलींची संख्या २,५९१ एवढी होती. दरम्यान जाहीर झालेल्या निकालानुसार ३,३८० मुले व २,४७२ मुलींनी सदर परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. एकूण ६,१६१ विद्यार्थ्यांपैकी ५,८५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरम्यान ९४.६७ टक्के मुलांनी तर ९५.४० टक्के मुलींनी पटकाविला असून चाळीसगाव तालुक्याचा एकूण निकाल हा ९४.९८ टक्के एवढा लागला आहे. यामुळे मुली ह्या मुलांपेक्षा पुन्हा वरचढ ठरल्या आहे.

बारावी परीक्षेचा निकाल बुधवार, ८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला. यात एकट्या मुलींचा निकाल हा ९७.३८ टक्के लागला होता. त्यातही मुलींनी आपली कर्तबगारी दाखवली होती. या निकालाने चाळीसगाव तालुक्यात मुलींनी मानाचा तुरा रोवला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!