रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीतर्फे विदगाव विद्यालयात पुस्तके व वह्या वितरण 

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | स्व.अभिमान महादू वारके विदगाव विद्यालयातील विद्यार्थ्यांना रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी तर्फे श्यामची आई हे पुस्तक व वह्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरीचे समन्वयक प्रा. प्राजक्ता पाटील, रोटरॅक्ट क्लब प्रेसिडेंट चेतन शिंदे, सेक्रेटरी वर्षा झोपे व क्लबचे मेंबर्स उपस्थित होते.

शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना श्यामची आई या पुस्तकाचे व सोबत एक वहीचे वाटप केले गेले. या मागचा उद्देश म्हणजे मुलांना शिस्त व नैतिकता समजावी व या पुस्तकामधील कथांमधून चांगला बोध मिळावा असा होता.

यावेळी शाळेचे सचिव विकास वारके, मुख्याध्यापक न्याहाळदे सर, समन्वयक रवींद्र अमृत पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content