पाचोरा महाविद्यालयात “जागतिक मानसिक आरोग्य दिन” उत्साहात संपन्न

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने नुकताच “जागतिक मानसिक आरोग्य दिन” आयोजित करण्यात आला.

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा. चेअरमन विलास जोशी, प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील व प्र. प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांच्या संकल्पनेतून जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सारथ्य मानसोपचार व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, नाशिक येथील समुपदेशक महेश शेलार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.  तसेच डॉ. जे. पी. बडगुजर यांनी मानसिक समस्या कशा निर्माण होतात ? व त्यावरील उपयोजनात्मक अंमलबजावणी यावर भर देऊन विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी समाजातील अंधश्रद्धा व मानसिक स्वास्थ ही काळाची गरज यावर अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यानिमित्ताने जागतिक महामारी कोरोना – १९ च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नकारात्मक / सकारात्मक विचार शैली, आत्महत्या व मानसिक स्वास्थ्य, यावर आधारित भित्तिपत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मानसिक आरोग्य दिन सप्ताह निमित्ताने सदर समारोपीय कार्यक्रमात मानसशास्त्रीय संकल्पनांवर आधारित रांगोळी स्पर्धा व दृश्य स्मृती खेळ स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तनया जाधव आणि  डिंपल कुमावत यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. सुवर्णा पाटील व आभार डॉ. प्राजक्ता शितोळे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. के. एस. इंगळे, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. इंदिरा लोखंडे, प्रा. उर्मिला पाटील, प्रा. मेघा गायकवाड, प्रा. अर्चना टेमकर, प्रा. कृतिका गोसावी उपस्थित होते. तर डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. सुवर्णा पाटील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मानसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

 

Protected Content