मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे व नगरसेवक गोलू बरडिया यांची बैठक संपन्न

बोदवड – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरात पार पडलेल्या कर्करोग तपासणी व मोतीबिंदु उपचार शिबिरात संशयित ५७  कर्करोगाचे रुग्ण आढळले होते. याबाबत पुढील उपचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथे बैठक संपन्न झाली. दिवाळीनंतर रुग्णांवर मोफत उपचार होणार आहेत.

 

शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १३ सप्टेंबर रोजी मोफत कर्करोग तपासणी व मोतीबिंदु उपचार शिबिर पार पडले होते. यात १०१  महिलांची व १८१ पुरुषांची कर्करोग तपासणी पार पडली. यात ५७ संशयित कर्करोगाचे रुग्ण तपासणीतून निदर्शनास आले होते. या रुग्णांवर ऊपचार करण्यासाठी विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी मंगेश चिवटे हे जिल्हा दौऱ्यावर आले असता आरोग्य शिबिराचा आढावा घेतला. त्यानंतर  दि. १६ रोजी नाशिक येथे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर यांच्याशी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे व  अमोल व्यवहारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी यांनी एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर येथील व्यवस्थापकांना विशेष सूचना दिल्या. दिवाळी नंतर नाशिक येथे प्रार्थमिक तपासणीत रुग्ण कॅन्सर बाधित आढळल्यास त्यांच्यावर पुढील मोफत उपचार करण्यात येणार आहे.

 

Protected Content