किरकोळ कारणावरून पाचोऱ्यात तरुणासह कुटुंबियांना मारहाण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  शहरातील देशमुखवाडी परिसरात किरकोळ कारणावरून तरुणासह कुटुंबियांना मारहाण केल्याने पाच जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कल्पेश अरुण माने (वय – २०) रा. देशमुखवाडी, पाचोरा हा तरुण दि. १६ आॅक्टोबर रोजी आपल्या घराजवळ उभा असतांना रितेश पाटील रा. कृष्णापुरी, पाचोरा हा तेथुन जात असतांनाच रितेश पाटील याने कल्पेश माने यास उद्देशुन माझ्याकडे रागाने का बघतो आहेस ? अशी विचारणा केली. दरम्यान दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. घटनास्थळी तुषार पाटील, ललित महाजन, उमेश पाटील व भोला पाटील (दुंड्या) सर्व रा. कृष्णापुरी, पाचोरा हे दाखल झाले. व त्यांनी कल्पेश माने याचेसह त्याची आई, वडिल व भावास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित आरोपी रितेश पाटील याने फिर्यादी कल्पेश माने याचे डोक्यात दगड मारुन जखमी केले. घटनेप्रकरणी कल्पेश माने याचे फिर्यादीवरून तुषार पाटील, ललित महाजन, उमेश पाटील, भोला पाटील उर्फ दुंड्या या पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.

Protected Content