आकाशात आज दिसणार, चंद्र आणि गुरूच्या पिघानयुतीचा अद्भूत नजारा !

moon and jupiter

r

जळगाव, प्रतिनिधी | आज (२८ नोव्हेंबर) सायंकाळी चंद्र आणि गुरूच्या पिघानयुतीचा अद्भूत आणि प्रेक्षणीय खगोलीय नजारा खगोलप्रेमींना बघायला मिळणार आहे. सर्वसामान्य लोकांना ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण इतकेच माहिती असते, पण ‘पिघानयुती’ हे  सुद्धा एक प्रकारचे ग्रहणच असते. ही ‘पिघानयुती’ अवकाशात नेहमी होत असते. पण आज ती आपल्या भागातून दिसण्याचा हा योग खूप वर्षांनी आला आहे.

 

जसे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की, सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यात पृथ्वी आली की, चंद्रग्रहण होते. तसेच गुरू आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला असताना चंद्राच्या मागे काही काळासाठी गुरुग्रह लुप्त किंवा दिसेनासा होतो, त्याला ‘पिघानयुती’ असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या
न कोणत्या ताऱ्यासमोरून जात असतो, जावेली तो एखाद्या ग्रहासमोरून जाताना त्याला झाकून टाकतो, तेव्हा आपल्याला निसर्गाचा हा अद्भूत आणि प्रेक्षणीय नजरा बघायला मिळतो. पूर्ण पिघानयुती व स्पर्शीय पिघानयुती असे पिघानयुतीचे दोन प्रकार आहेत. पूर्ण पिघानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जातो आणि ग्रहण सुटते तसे चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर येताना दिसतो. हा काळ सुमारे एक तासाचा असू शकतो. स्पर्शीय पिधानयुतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाला अलगद स्पर्श करतो. फक्त स्पर्श करत असल्याने हा काळ खूप छोटा असतो.

चंद्र झाकणार गुरूला :-
आज सायंकाळी ५.०० वाजता गुरूसमोर चंद्र येणार या पिघानयुतीला म्हणजे गुरूसमोर चंद्र यायला सुरुवात झालेली असेल, सूर्यास्तानंतर ज्यावेळी आपल्याला चंद्र दिसायला लागेल, त्यावेळी चंद्राने गुरूला पूर्ण झाकलेले असेल. साधारण ६.१० मिनिटांनी चंद्रकोरीच्या मागून गुरु हळूहळू बाहेर येवू लागेल. ६ .२५ मिनिटांनी गुरू त्याच्या चार मुख्य चंद्रांसह बाहेर आलेला असेल आणि चंद्रकोरीच्या खाली गुरू ग्रह व त्याचे चार चंद्र असे प्रेक्षणीय दृश्य दुर्बिणीतून दिसेल.

मु.जे. महाविद्यालयातून बघता येणार नजारा :-
तसे तर पिघानयुतीचे हे अद्भूत दृश्य खगोलप्रेमी लोकांना साध्या डोळ्यांनीही बघता येवू शकते, फक्त त्यावेळी त्यांना गुरु ग्रहाचे चार चंद्र दृष्टीस पडणार नाहीत. त्यासाठी १२ इंचांच्या परावर्तीत दुर्बिणीतून पिघानयुतीचा हा नजारा बघण्याची संधी मु.जे.महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३०
यावेळेत मू.जे. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मू.जे.चा भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलेआहे. या संधीचा खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक अमोघ जोशी व भूगोल विभागाच्या प्रमुख प्रा. प्रज्ञा जंगले यांनी केले आहे.

Protected Content