Home आरोग्य जळगावातील शिववंदन फाऊंडेशन व वाजीद फाऊंडेशनतर्फे फळवाटप व वृक्षारोपण

जळगावातील शिववंदन फाऊंडेशन व वाजीद फाऊंडेशनतर्फे फळवाटप व वृक्षारोपण

0
107

जळगाव प्रतिनिधी । शहरातील व्यापारी साजिदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक कृषि दिनानिमित्त केशवस्मृती प्रतिष्ठान येथील बेघर निवारा विश्रामगृहात गरजूंना फळ वाटप व शिरसोली रोडवर वृक्षारोपण करण्यात आले.

शहरातील उद्योगपती साजिदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त शिववंदन फाऊंडेशन व वाजीद फाऊंडेशन यांच्यातर्फे जागतिक कृषी दिना निमित्ताचे औचित्य साधत नवीन बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या केशव स्मृती प्रतिष्ठानच्या बेघर निवारा विश्रामगृहात वृद्ध व जेष्ठ नागरिकांना आज फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आले. यावेळी जवळपास ५० ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप करण्यात आले. तसेच शिरसोली परिसरामध्ये वृक्षारोपण ही यावेळी करण्यात आले. यावेळी शिववंदन फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड, वाजीद फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विशाल वाघ, निलेश मोझर, सुनील चोरट कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानतर्फे मनोज कुलकर्णी व मनीषा पारधे यांनी परिश्रम घेतले.

 

https://www.facebook.com/watch/?v=569113050453264


Protected Content

Play sound