विद्यापीठात पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती अभियान कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेत शिक्षणशास्त्र विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि क्षमता निर्माण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर रोजी पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती अभियान कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील यांच्या हस्ते रोपटयाला पाणी देवून झाले. यावेळी संचालक डॉ. मनिषा इंदाणी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संतोष खिराडे उपस्थित होते. हितेश ब्रिजवासी यांनी पर्यावरण संरक्षण निती, डॉ. रणजित पारधे यांनी पर्यावरण पुरक साहित्य निर्मिती प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. अधिसभा सदस्य डॉ. किर्ती कमळजा यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. ६५ विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. समन्वयक म्हणून डॉ. स्वाती तायडे, सहसमन्वयक म्हणून डॉ. रणजित पारधे यांनी काम पाहिले. प्रियंका पवार हिने सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष खिराडे यांनी प्रास्ताविक केले.

Protected Content