रिषभने खेळात सुधारणा करावी अन्यथा संघ सोडावा – लक्ष्मण

pant 1

नवी दिल्ली वृत्तसंस्था । संधी असूनही फलंदाजीत अपयशी ठरत असल्यामुळे युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. जरी अनेक दिग्गज क्रिकेटर्स यांनी पंतला पाठिंबा दर्शविला असला तरी, माजी क्रिकेटर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी रिषभला सल्ला दिला आहे. ‘खेळात सुधारणा करावी, अन्यथा संघाबाहेर जाण्याची तयारी ठेवावी लागेल’, असा कोचक इशारा लक्ष्मणने दिला आहे.

संघ व्यवस्थापनाने विकेटकीपर रिषभ पंतला जितका वेळ दिला आहे, जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवावा लागेल. जर त्याने फलंदाजीत सुधारणा केली नाही तर संजू सॅमसन त्याची जागा घेऊ शकतो, असे ही लक्ष्मण म्हणाला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत संजू सॅमसनची झालेली निवड हा पंतसाठी एक प्रकारे इशारा आहे. त्यामुळे ‘खेळ सुधारला नाही तर संघ सोडावा लागेल’. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने सॅमसनची संघात निवड करून आमच्याकडे पर्याय उपलब्ध करुन दिला आहे, असा इशारा देखील रिषभला दिला आहे. रिषभला भरपूर संधी मिळाली आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्याशी चर्चा सुध्दा केली असावी, असा मला विश्वास आहे, असेही लक्ष्मण म्हणाला.

खेळाडूला संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा लागतो. दुर्दैवानं पंत विश्वास सार्थ ठरवण्यात अपयशी ठरत आहे. मात्र, त्याच्याकडे ‘एक्स’ फॅक्टर आहे. तो एक जबरदस्त फलंदाज आहे हे मी अजूनही मानतो. मैदानात उतरल्यानंतर तो मोठे फटके मारून सामन्याचे चित्र बदलू शकतो, असा विश्वासही लक्ष्मणने व्यक्त केला.

Protected Content