जळगावात स्मृती इराणी यांच्या प्रतिमेस महिलांचे ‘जोडे मारो’ आंदोलन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  संसदेमध्ये भाजपाचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांच्यासोबत गैरवर्तणूक केली त्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या महिलांनी जोडे मारून स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला.

जिल्हाध्यक्ष देवेन्द्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन समोर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिमेस युवक काँग्रेसच्या महिलांनी जोडे मारून स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. संसदेमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी हे मूळ बंगाली भाषिक असल्यामुळे भारताचे राष्ट्रपती द्रापदी मुर्मु यांच्याबद्दल चुकून राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी हा शब्दप्रयोग केला गेला. त्यासंदर्भात त्यांनी लगेच संसदेमध्ये माफी मागून शब्द मागे घेतला. तरी देखील भाजप पक्षाकडून मात्र या गोष्टीचे भांडवल केला जात आहे.

त्याच अनुषंगाने सदरच्या प्रकरणांमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची कुठलीही चूक नसताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र संसदेमध्ये सोनिया गांधी बाहेर निघत असताना त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केली.

या त्यांच्या कृत्यामुळे संबंध भारत देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन दुखावले गेले. त्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने देखील जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली स्मृती इराणी यांच्या प्रतिमेस युवक काँग्रेसच्या महिलांनी जोडे मारून जोडे मारो आंदोलन केले.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी प्रशांत उगले, जळगाव शहराचे प्रभारी राहुल माणिक, जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे,  शहराध्यक्ष मुजिब पटेल, मोसिन बागवान, मुरली सपकाळे मकसूद पटेल, अरुणा पाटील नीला तायडे, रश्मी ताळे, निलेश कोळी, इमरान शेख, दीपक पाटील, सुनील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content