चाळीसगावात गुटखा भरलेला कंटेनर जप्त !

Chalisgaon चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मालेगाव बायपास जवळ चाळीसगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ९२ लाख रूपयांचा गुटखा भरलेला कंटेनर जप्त करण्यात आला आहे.

चाळीसगावसह परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत असून याआधी देखील अनेकदा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याच प्रकारे काल सायंकाळी चाळीसगाव पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.

शहरातून कंटेनरमध्ये गुटखा भरून जात असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने मालेगावरोड बायपासजवळ पथकाने सापळा रचला. यात त्या संशयास्पद कंटेनरची तपासणी केली असता यात १५१ पोते गुटखा भरल्याचे आढळून आले असून याचे मूल्य तब्बल ९२ लाख रूपये इतके असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर ट्रक आणि गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, सागर ढिकले, विनोद भोई, राकेश पाटील, पवन पाटील यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे परिसरातील गुटखा तस्कर धास्तावले आहेत.

Protected Content