मध्यरात्री झाली शिंदे व शाह यांची भेट : मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात काल मध्यरात्री पुन्हा एकदा प्रदीर्घ चर्चा झाली असून यातून मंत्रीमंडळावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक महिला उलटून गेला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार न झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. मंत्राखात्यांची वाटणी आणि न्यायालयीन पेच यांच्या विस्तार अडकल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, काल रात्री दिल्लीत एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विस्तृत चर्चा केल्याचे वृत्त आहे.

एकनाथ शिंदे हे रात्री बाराच्या सुमारास औरंगाबादहू दिल्लीस पोहचले. तेथे अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांनी दोन तास चर्चा केली. यानंतर ते पहाटे पाच वाजता पुन्हा औरंगाबाद येथे परतले. या चर्चेतून मंत्रीमंडळ विस्ताराचे गाडे पुढे सरकेल असे मानले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: