महादेवाला अभिषेक करून ना.जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

na. javale prachar

रावेर, प्रतिनिधी | येथील विधानसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, रासप, रिपाई, रयत क्रांती, शिव संग्राम या पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज (दि.८) दसऱ्याच्या मुहूर्तावर तामसवाडी येथील ओंकारेश्वर मंदिरात महादेवाचा अभिषेक करून व नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, यांच्यासह अशोक कांडेलकर, मधुकर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, व्हाईस चेअरमन भागवत विश्वनाथ पाटील, श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, प्राध्यापक सुनील नेवे, हरीश गनवाणी, रूपालीताई राणे, हिरालालभाऊ चौधरी, हर्षल पाटील, नारायण बापू, भानुदास चोपडे, प्रल्हादजी महाजन, महानंदा होले, रासपचे अध्यक्ष पवार, अंजलीताई चौधरी, सौ.पल्लवी चौधरी, डॉक्टर कुंदन फेगडे, सुरेश धनके, अतुल पाटील, डॉक्टर नरेंद्र कोल्हे, अमोल पाटील, उज्जैन सिंग राजपूत, राकेश फेगडे, भरत महाजन, नंदाताई, बाळू फेगडे, उमाकांत फेगडे, पुरुजित चौधरी, लहु पाटील अनंता फेगडे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रावेर लोकसभा मतदार संघाची निवडणूक नुकतीच झाली त्यात खासदार रक्षाताई खडसे यांना चाळीस हजार मताधिक्य मिळाले होते आणि आहे ही आकडेवारी लक्षात घेता रावेर विधानसभा मतदारसंघात आमदार हरिभाऊ जावळे यांच्याबाबत सुद्धा चाळीस हजार लोकांच्या मतांमध्ये कदापि परिवर्तन होणार पर्यायी हरिभाऊ जावळे सुद्धा प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील असा आत्मविश्वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी यावेळी व्यक्त केला.

दादागिरी नव्हे मतदारांवर हक्क – आ. एकनाथराव खडसे
आम्ही म्हणजे नाथाभाऊ, खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे हे आपल्या मतदार संघात मतदारांच्या, नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील असून काही महत्त्वाच्या अर्जंट कामांसाठी नागरिकांच्या सेवेसाठी अर्ध्या रात्री धावून येत असतात, त्यामुळे मतदारांवर आमची दादागिरी नसून हक्क आहे, तसेच कामे न करणाऱ्यांना मत देऊन आपले मत वाया घालवू नका राज्यात आमचे म्हणजे भाजपचे सरकार येणार आहे. तसेच दिल्लीत सुद्धा आमचेच सरकार आहे, भलेही नाथाभाऊ सरकारमध्ये राहणार नाही परंतु भारतीय जनता पार्टी आपल्या सर्वांचे कामे वेळेवर करणार असल्याचे सुद्धा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपस्थितांना सांगितले.

1985 मध्ये जिल्ह्यात पहिल्यांदा भाजपाचा आमदार झाला
सन 1985 मध्ये संपूर्ण राज्यात भारतीय जनता पार्टीला प्रतिकूल परिस्थिती असताना अशा परिस्थितीत रावेल विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर गुणवंतराव सरोदे यांना भारतीय जनता पार्टीकडून पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मिळाला आहे, आणि आता तर अनुकूल परिस्थिती आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे हेच निवडून येतील कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्यांच्या बळावरच निवडणुका जिंकल्या जातात नेत्यांची ताकद ही कार्यकर्त्यांच्या बळावरच अवलंबून असते, असे सुद्धा नाथा भाऊंनी सांगून आपले गांव आणि आपले बूथ केंद्र याच्यावरच बुथ प्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी आपले लक्ष केंद्रित करावे असेसुद्धा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले.

Protected Content