आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल – शरद पवार

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर ‘भाजप हाच एकनाथ शिंदे यांच्या मागे असणारा राष्ट्रीय पक्ष असून अजित पवारांना त्याची जास्त माहिती नसेल असं म्हणत बंडखोर आमदारांना त्यांचे बहुमत सिद्ध करण्यासाठी इकडे यावेच लागेल’ असं वक्तव्य  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

याविषयी बोलतांना पवार यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. मात्र गुजरात आणि आसामला ज्या लोकांनी शिंदेची व्यवस्था केली ते अजित पवारांच्या परिचयाचे नसून  ते माझ्या परिचयाचे आहेत. त्यामुळे मला त्याची माहिती असल्याचे सांगत शिंदेंच्या मागे भाजपच असल्याचे पवार यांनी सांगितलं.

कोरोना काळात उत्तम काम केलं. हे असं असताना राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग फसला हे म्हणणं राजकीय अज्ञान असल्याचं सांगत सरकार टिकणार की नाही हे विधानसभेतील बहुमत ठरवेल मात्र महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!