प्रताप नगरातून महिला दोन दिवसांपासून बेपत्ता

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रतापनगरातील साईबाबा मंदीरासमोर राहणाऱ्या ५२ वर्षीय महिला घरात कुणाला काहीही न सांगता तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्या आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिल्पा पुरूषोत्तम चौधरी (वय-५२) रा. डेम्ला कॉलनी, साई बाबा मंदीरासमोर प्रताप नगर, जळगाव या महिला वडील रामकृष्ण त्र्यंबक पाटील यांच्यासह वास्तव्याला आहे. सोमवारी २० जून रोजी सकाळी ७ वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाल्या आहे. त्यांचे वडील रामकृष्ण पाटील यांनी त्याचा नातेवाईक व परिसरात शोधाशोध केली परंतू त्या कुठेही आढळून आल्या नाही. मंगळवारी २१ जून रोजी रामकृष्ण पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.