Home आरोग्य जळगाव कोरोना : ‘त्या’ रुग्णाच्या परिवारातील १८ जणांना केले आयसोलेशन वार्डात दाखल

जळगाव कोरोना : ‘त्या’ रुग्णाच्या परिवारातील १८ जणांना केले आयसोलेशन वार्डात दाखल

0
101


जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या मेहरूण परिसरातील ४९ वर्षाच्या व्यक्तीची कोरोना संसर्गाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी आरोग्य यंत्रणेने त्या रुग्णाच्या परिवारातील १८ जणांना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. दरम्यान, यंत्रणेने संबंधीत रूग्णाच्या कुटुंबासह तो गत काही दिवसांमध्ये नेमका कुणाच्या संपर्कात आला हे शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.

 

शहरातील मेहरूण भागातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट शनिवारी पॉझीटीव्ह आला होता. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संबंधीत रूग्णाच्या कुटुंबासह तो गत काही दिवसांमध्ये नेमका कुणाच्या संपर्कात आला हे शोधण्याचे काम आता सुरू झाले आहे. यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी मेहरूण परिसराला सील करण्याचे आदेश दिले असून याची रात्री तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्या रूग्णावर उपचार देखील सुरू करण्यात आले आहेत. तथापि, संबंधीत व्यक्ती हा गेल्या दहा दिवसांपासून शहरात असून तो या दरम्यान अनेक जणांना भेटलेला आहे. त्याचे एकत्र कुटुंब असून यात १८ जणांचा समावेश आहे. यामुळे त्याच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्यांची चाचणी घेऊन यातील निष्कर्षानुसार त्यांना उपचार सुचविण्यात येणार आहेत. अगदी चाचणी निगेटीव्ह असली तरी त्यांना होम क्वॉरंटाईनच्या माध्यमातून विलग ठेवले जाणार आहे. दरम्यान, रुग्णाच्या परिवारातील १८ जणांना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे.


Protected Content

Play sound