लॉकडाऊन : पुण्यातून आलेल्या ‘त्या’ दोघांची तातडीने तपासणी करा : प्रतिभा शिरसाठ

जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना शहरातील एका भागात दोन जण शनिवारी पहाटे पुणे येथून आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आपण प्रशासनाला माहिती देऊन देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. शहरात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याहून आलेल्या दोघांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिरसाठ यांनी केली आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते प्रतिभा शिरसाठ यांनी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ सोबत बोलताना सांगितले की, शहरातील एका भागात शनिवारी पहाटे एक बहिण-भाऊ पुण्याहून परतले. काही नागरिकांनी त्यांना देशात लॉकडाऊन असतांना तुम्ही प्रवास कसा केला?, याची विचारपूस केली. तसेच त्यांना रुग्णालयात तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. परंतू त्यांनी ऐकले नाही. याबाबत एक जागरूक नागरिक म्हणून प्रतिभा शिरसाठ यांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी संपर्क साधला. परंतू त्यांच्या सूचनेकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. यामुळे त्यांनी आज ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ कडे याबाबत व्यथा मांडली. लॉकडाऊन काळात स्थलांतर केल्यानंतर रुग्णांनी स्वयंम शिस्तीने तपासणी करून घेणे गरजचे असल्याचेही सौ.शिरसाठ म्हणाल्या. दरम्यान, शहरातल्या मेहरूण परिसरातील ४९ वर्षाच्या व्यक्तीची कोरोना संसर्गाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी आरोग्य यंत्रणेने त्या रुग्णाच्या परिवारातील १८ जणांना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्यातील आलेल्या दोघांची तपासणी करणे गरजेचे असल्याचेही सौ.शिरसाठ यांनी म्हटले.

Protected Content