फैजपूर येथे दिव्यांग सेनेतर्फे गरजूंना दूध व बिस्किटचे वाटप

फैजपूर प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील गरीब वस्तीत राहणारे मुले, स्त्रिया व वृध्दांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. येथील दिव्यांग सेनेतर्फे आज दूध व बिस्किट वाटप करण्यात आले आहे.

समाजऋण फेडण्याच्या वृत्तीतुन दिव्यांग सेनेचे अध्यक्ष नाना लक्ष्मण मोची यांच्यासह प्रा. लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, अजय मेढे, लोकेश कोलते, गिरीश कापडे, अजय जोरेवाल, आकाश जोरेवाल, संजय मेढे, नितीन इंगळे, मंगेश सावकारे, संजय वानखेडे, बबन तायडे, विक्की जोगी, बाळा कोळी व शिव कॉलनी मित्र मंडळ सदस्य यांनी पुढाकार घेऊन गरिबांना दूध व बिस्किटांचे वाटप केले. संपूर्ण देशात लॉकडाऊन मुळे कामगार व हात मजुरी करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी फैजपूरचे प्रांत डॉ. अजित थोरबोले व पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दिव्यांग सेनेने हा उपक्रम राबवला. यापुढेही समाजातील गरजू घटकाला आवश्यक ती मदत पुरविण्याचा मानस दिव्यांग सेना कार्यकर्ते व शिव कॉलनी मित्र मंडळाने केला आहे.

Protected Content