मेहरूण परिसरात निर्जंतुकीकरणास प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मेहरूण परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कालच महापौर भारती सोनवणे यांनी परिसराला भेट देऊन माहिती जाणून घेत निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या त्यानुसार आज निर्जंतुकीकरणास प्रारंभ झाला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा आज सकाळ ९ वाजेपासून मेहरूण परिसरात दाखल झाली आहे. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी मेहरूण येथे घरोघरी जाऊन कुटुंबात किती सदस्य आहे ? कोणी आजारी आहे का ? याची माहिती घेत आहेत. मलेरिया विभागाचे ८-१० जणांचे पथक व दवाखाना विभागाचे ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांचे देखील सहकार्य लाभत आहे. दरम्यान, आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मलेरिया विभागातर्फे निर्जंतुकीकरणप्रसंगी सहाय्यक आयुक्त पवन पाटील, मलेरिया विभागाचे डॉ. विकास पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी , नगरसेवक प्रशांत नाईक, मलेरिया श्री. सोनवाल, आरोग्य निरीक्षक सोनवाल, मोकादम रईस शेख, व कर्मचारी यांनी संपूर्ण भागात ब्लिचिंग पाणी फवारणी करुन घेत आहेत.

Protected Content