जय बाबाजी भक्त मंडळ पारोळातर्फे कर्मचाऱ्यांना बिस्कीटे व पाणी वाटप

पारोळा प्रतिनिधी । संचारबंदीच्या काळात गरजूंना मदत करणारे डॉक्टर, पोलीससह गरीबांना येथील जय बाबाजी भक्त मंडळाच्या वतीने बिस्कीट व पाणी वाटप करण्यात आले.

एक हात मदतीचा सध्याच्या काळात होत असलेल्या कोरोना वायरसच्या त्रासमुळे संपुर्ण भारतबंदीचे आवाहन केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्या अनुशंगाने आज २९ रोजी जय बाबाजी भक्त परिवार पारोळा यांच्यातर्फे ऑन डयूटी काम करत असलेले पोलिस, बांधव व सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स, कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, गरीब लोक, बिस्किट पाकिट व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले. यावेळी संजय पाटील, रवि पाटिल, भरत महाजन, रवि वाणी, हिलाल पाटील, आबा चौधरी, अशोक पाटील, बाळा पाटील, राकेश पाटील, रितेश खैरनार, रोशन पाटील, मनोज पाटील, दीपक पाटील, शैलेश पाटील, मनोज पाटील, प्रदीप चव्हाण, निलेश चव्हाण, नाना चव्हाण, दादा चौधरी आदि उपस्तित होते.

Protected Content