डॉ. अब्दुल सालार यांचा इकरा थीम कॉलेजतर्फे सत्कार

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव संचलित एच. जे. थीम कॉलेज जळगाव येथे इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सालार यांचा सत्कार कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अख्तर शाह यांनी पवित्र कुराण पठणाने केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विद्यापीठाचे बी. सी.यु. डी . चे डॉ. इरतेकाज अफजल खान, हे होते. तराना ए इकरा रफत शेख आणि ग्रुपने सादर केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य इब्राहिम पंजारी यांनी प्रस्तावना केली. डॉ.इरफान बशीर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यावेळी महाविद्यालयाचे चेरमन डॉ.इकबाल शाह, सोसायटीचे सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, डॉ.ताहिर शेख, अमीन बदलीवाला, डॉ.अमानुल्ला शाह, प्रा.शेख जफर, अब्दुल अजीज सालार, अब्दुल करीम सालार आणि डॉ. इकबाल शाह यांचे मित्र डॉ.ए.जी.खान, मुकीम खान, अख्तर खान, उमर शेख, रज्जाक परवाज, फरीद वकील, इफ्तिखार अहमद, फय्याज अहमद, रशीद जनाब, लुकमान गार्ड, अयुब शाह, अकबर खान, नजीर सरपंच, अख्तर यांचे मित्र उपस्थित होते. खान मिर्झा अख्तर बेग, गझनफर शेख, सत्तार खाटिक यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य व स्टाफ तर्फे शाल व पुष्प देऊन सत्कार केले.

यावेळी मित्रांनीही डॉ. अब्दुल करीम सालार यांचां सत्कार केला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अध्यक्ष वसीम अख्तर व सचिव आसिफ खान यांनी सत्कार केला डॉ.फिर्दौस, डॉ.अमानुल्ला शाह, एजाज अब्दुल गफ्फार मलिक, डॉ.इकबाल शाह यांनी डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या कार्याचे कौतुक केले.

यानंतर अख्तरखान औरंगाबाद यांनी सालार यांच्या सेवेत अभिनंदनपर कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अब्दुल करीम सालार यांच्या सेवेत प्रा.काझी मुझम्मीलोद्दीन नदवी यांनी सीपास नामा सादर केला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी त्यांचे सत्कार केले.

सत्कार स्विकारताना अब्दुल करीम सालारसाहेब म्हणाले की, मी कोणत्याही पुरस्काराचा हक्कदार नाही पण तुमच्या प्रेमाने मला पात्र बनवले आहे.तुम्ही माझ्यावर केलेल्या सत्करा बद्दल मी तुमचा आभारी आहे. लोकांच्या हृदयात राहणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. त्यानंतर अध्यक्षीय भाषण करताना डॉ.ए.जी.खानसाहेब म्हणाले की, औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. तेथूनच आम्हा सर्व मित्रांची ओळख झाली. ज्यामध्ये करीम सालार आघाडीवर होते. अब्दुल करीम सालार हे खानदेशच्या परिसरात ज्ञानाची दीप प्रज्वलित करणारे तेजस्वी दिवा आहेत. आपल्या समाजाच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील रहातात. स्वतःसाठी कधीही पदे मागितली नाही. अब्दुल करीम सालार यांनी पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे.

समारंभाच्या शेवटी आभार डॉ चांद खान यांनी मानले. सुत्रसंचालनाचे कर्तव्य डॉ.वकार शेख यांनी अतिशय चोखपणे पार पाडले. कार्यक्रमाला इकरा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, इकरा संस्थांचे इतर शाळेचे प्राचार्य व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content