पीर गैबनशाह बाबा उर्स निमित्ताने कव्वालीचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सिम येथील पीर गैबनशहा वली बाबा यांच्या दर्गावर ६ व ७ जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आले असून या दोन दिवस चालणाऱ्या उर्स उत्सवात कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.

दहिगाव ता. यावल येथून जवळच असलेल्या पीर गैबन शाहवली बाबा यांचा यात्रोत्सव ६ रोजी संदल व ७ रोजी उर्स असून या निमित्ताने ७ जानेवारी रोजी मनोरंजनासाठी कव्वालीचा भव्य असा मुकाबला आयोजित करण्यात आलेला आहे.
६ रोजी भव्य अशी संदल रॅली काढण्यात येणार आहे.

बाबांच्या दर्गावर जिल्हाभरातून हजारो भाविक येऊन आपल्या मानलेल्या मानता देत असतात व भव्य रॅली ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या वाद्यात काढण्यात येतात. ७ जानेवारी रोजी यात्रा उत्सवाच्या आयोजन असून यात्रे निमित्ताने जुनेद सुलतानी आणि परवीन रंगीली यांचा भव्य कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आलेला आहे. या उर्स निमित्ताने पंचक्रोशीतील सर्वधर्मीय भाविकांनी बाबाच्या दर्गाचे दर्शन व प्रसादाच्या तसेच कव्वाली मनोरजंन कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन हिंदू मुस्लिम पंच कमिटी सावखेडा सिम यांनी केलेले आहे

Protected Content