खडके येथून महिला मुलासह बेपत्ता

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडके येथून एक महिला व तिचा लहान मुलगा दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार अमळनेर पोलिस स्टेशन ला दाखल करण्यात आली आहे.
तालुक्यातील खडके येथील प्रमिला कपिलदेव पाटील (वय-२४) व त्यांचा मुलगा प्रसाद कपिलदेव पाटील (वय-दीड वर्ष) हे ३१ डिसेंबरला सकाळी १० वाजेच्या सुमारास अमळनेर येथे दवाखान्यात जात असल्याचे सांगून खडके येथून बसमध्ये बसले मात्र सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने त्यांची शोधाशोध केली असता ते कुठेही सापडले नाहीत.कपिलदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून पत्नी व मुलगा हरवल्याची तक्रार अमळनेर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास फौ. संजय पाटील करत आहेत.

Protected Content