रावेर येथून बैल व वासरीची चोरी ; पोलीसात गुन्हा दाखल

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे सार्वजनिक जागी एका शेतकऱ्याचा बांधलेल्या ४० हजाराचा बैल व २० हजार रुपये किंमतीची जर्सी वासरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रावेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हरीश पारुमल जगवाणी (वय-६९) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ फेब्रुवारी सकाळी ६ ते १० मार्च सकाळी रोजी त्यांनी बैल व वासरी सार्वजनिक जागी बांधली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ४० हजार किमतीचा बैल व २० हजार रुपये किंमतीची जर्सी वासरू चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी बैल व वासरूचे इतर परिसरात शोध घेतला परंतु त्यांना बैल कुठेही मिळून आला नाही. यासंदर्भात हरीश पारुमलजगवाणी यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून १० मार्च रोजी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक महेंद्र सुरवाडे करीत आहे.

 

Protected Content