कोवीड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्ड उपलब्धतेची भाजपा महिला आघाडीची मागणी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोवीड सेंटरमध्ये महिलांकरीता स्वतंत्र वार्ड उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा महिला आघाडी महानगरतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात आज अनेक कोवीड केअर सेंटर आहे. याठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र वार्डची निर्मीती करून तिथे सुरक्षिततेकरीता महिला कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, सोबत प्रत्येक वार्डात सीसीटीव्ही बसविण्यात यावा जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. यावेळी भाजपा महिला आघाडी महानगरतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, आयुक्त सतिष कुळकर्णी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर महापौर भारती सोनवणे, माजी आमदार स्मिता वाघ, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, माजी अध्यक्षा रेखा वर्मा यांच्यासह महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Protected Content