बदलत्या राजकीय स्थितीचा राष्ट्रवादीला होणार लाभ-आदिक

पाचोरा प्रतिनिधी | बदलत्या राजकीय स्थितीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला लाभ होण्याची शक्यता असून यासाठी सर्वांनी झटून कामाला लागावे असे आवाहन पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांनी केले. ते मतदारसंघाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

पाचोरा येथे पाचोरा-भडगाव मतदारसंघासाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक पार पडली. याला पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदिक यांची उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार मनीष जैन, गटनेते संजय वाघ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय पवार, नामदेव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश आदिक यांनी सर्वांनी एकोप्याने काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठी संधी आहे. राजकीय बदलांचा चांगला फायदा घेतला जाऊ शकतो आणि संघटन मजबूत करण्यासाठी देखील प्रयत्न केले जाऊ शकतात. पक्षाला पुढील काळात विधानसभेतही यश मिळेल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, दिलीप वाघ आदींनी देखील मनोगत व्यक्त केले.

यावेळी जिल्हा प्रवक्ता खलील देशमुख, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव, पाचोरा शहर अध्यक्ष अजहर खान, भडगाव शहर अध्यक्ष श्याम भोसले, भडगाव कार्याध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शालिग्राम मालकर, सतीश चौधरी, अविनाश सुतार, नगरसेवक नगरसेवक बशीर बागवान, सिताराम पाटील, प्रा.भागवत महालपुरे, रणजीत पाटील, प्रकाश पाटील, नितीन तावडे, वासुदेव महाजन, अशोक मोरे, ए. बी.अहिरे,योगेश पाटील, सत्तार पिंजारी आदी उपस्थित होते.

Protected Content