गुरांना कोंबून वाहतूक करणारा ट्रक जप्त; चालक फरार

रावेर प्रतिनिधी | वाहनात गुरांना कोंबून वाहतूक करणार्‍या ट्रकला पोलिसांनी तालुक्यातील भातखेडा गावाजवळ जप्त केले असून ट्रकचा चालक मात्र फरार झाला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महेंद्रा ब्लाझो या ट्रकमध्ये गुरांची कोंबून वाहतूक करत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने तालुक्यातील भातखेडा येथून जाणार्‍या आरजे ५२ जीए-५४१६ या क्रमांकाच्या ट्रकला थांबविण्यात आले असता यात गुरांना कोंबलेले आढळून आले. पोलिसांनी पाहणी केली असता यात १९ गायी आणि ३३ गोर्‍हे जीवंत तर दोन गायी आणि ९ गोर्‍हे मृत अवस्थेत आढळून आले. काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा ट्रक रावेर पोलिसांनी जप्त केला. मात्र जप्तीची कारवाई होत असतांना ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लीनर मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.

या प्रकरणी रावेर पोलीस स्थानकामध्ये कॉन्स्टेबल उमेश रमेश नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रकचा मालक आणि चालकाच्या विरूध्द गुरनं २२९/२०२१ भादंवि कलम ४२९; महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम कलम ५(अ),(ब); आणि महाराष्ट्र पशू क्रूरता अधिनियम ११चे (१) (ए) (एफ) (एच) (के) (आय) (९) आणि सह महा. पो. अधिनियमातील कलम ११९; पशू वाहतूक अधिनियम ४७,४८,४९ (अ) आणि मोटर वाहन अधिनियम ८३/१७७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि शितलकुमार नाईक;
पोउनि मनोज वाघमारे;
पोउनि अनिस शेख; दाखल अंमलदार- सफौ शेख इस्माइल
तपासी अंमलदार- पोहेकॉ. सतीश सानप हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!