कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, उद्धव ठाकरे नेहमीच रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येत जातात : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) अयोध्येशी शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. हे नाते केवळ राजकारणासाठी नाही. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

राऊत पुढे बोलताना ते म्हणाले की, अयोध्या आणि शिवसेनेचे राजकीय नाते नाही. उद्धव ठाकरे नेहमीच रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत जातात. जेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यावरही गेले होते. राजकारणासाठी आम्ही अयोध्येत जात नाही. राम मंदिराचा पूर्ण रस्ता शिवसेनेने तयार केलेला आहे. मंदिरामध्ये येणारे मुख्य अडथळे होते ते शिवसेनेने दूर केले. राजकारण म्हणून नाही, तर श्रद्धा, हिंदुत्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिले. ते आमचे नाते कायम आहे, असेही राऊत म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचं निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे.

Protected Content