‘मातोश्री’चा आदेश मानून सावकारे यांच्या विजयासाठी कामाला लागा- लोणारी

bhusaval baithak

भुसावळ, प्रतिनिधी | खरा शिवसैनिक ‘मातोश्री’चा आदेश डावलत नाही, आदेश येताच तो युतीच्या उमेदवाराच्या कामाला लागतो. त्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश मानून युतीचे उमेदवार संजय सावकारे यांना विजयी करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी प्रभारी नगराध्यक्ष व जुने जाणते शिवसैनिक युवराज लोणारी यांनी आज (दि.१३) केले आहे. वरणगाव येथे विठ्ठल मंदिरात आयोजित शिवसेनेच्या बैठकीत ते बोलत होते.

 

बैठकीस शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख तथा नगरसेवक मनोज बियाणी, शिवसेना तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेवक पप्पू बारसे, शिवसेना माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, प्रमोद सावकारे, ॲड.निर्मल दायमा, शहर प्रमुख बबलू ब-हाटे, वरणगाव येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संजीव कोलते, सुभाष चौधरी, रवी सुतार, महेंद्र शर्मा, शहर उपप्रमुख हर्षल पाटील, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकात शर्मा, सूरज पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करतांना कोलते यांनी युतीचा आदेश आहे. त्यामुळे आम्ही कामाला लागलो असल्याचे सांगितले. महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांना आपण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपा व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे व सहा महिन्यानंतर होणाऱ्या वरणगाव नगरपालिकेत शिवसेनेला किमान सहा जागा देऊन युती करावी, असे आवाहन त्यांनी केले. नगरसेवक मनोज बियाणी, यांनी विधान सभेवर युतीचाच झेंडा फडकला पाहिजे, यासाठी शिवसैनिकांनी भाजपासोबत खांद्याला खांदा लावून काम करावे, असे आवाहन केले. बैठकीस सुनील भोई, अतुल शेटे, सुरज पाटील, चंद्रकांत शर्मा, दिगंबर चौधरी, संजीव सोनवणे, राम शेटे, प्रकाश मराठे, जितेंद्र देवघाटोळे, नितीन देशमुख, सुखदेव धनगर, नितीन मराठी, गौरव भोई, दिनेश भोई, विजय वंजारी, मनोज चौधरी, राजेश भोई यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content