श्री बद्रीनारायण संस्थेतर्फे आ. अनिल पाटलांचा सत्कार

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील अत्यंत प्रचलित असलेल्या श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिरासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व  आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी चार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाले. या यशस्वी प्रयत्नांबद्दल आ.अनिल पाटील यांचा श्री बद्रीनारायण संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासासाठी श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिर संस्थानसाठी 4 कोटी निधी मंजूर झाला आहे,यात पालकमंत्री सोबतच आमदार अनिल पाटील यांचे विशेष असे योगदान असल्याने श्री क्षेत्र बद्रीनारायण संस्थेच्या वतीने उपमुख्य ट्रस्टी गुलाबराव सहादू पाटील, ट्रस्टी आसाराम चौधरी, ट्रस्टी दगडू महाजन, दामू भोई, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, सचिव देविदास वाणी, तसेच बहादरपूर सरपंच भिकन रामदास पारधी, उपसरपंच सुनील वाणी, माजी उपसरपंच तथा सदस्य परेश चौधरी, निंबा भोई, प्रभाकर भोई, राजेंद्र वाणी, किरण पवार तसेच शिरसोदे सरपंच रमेश सैंदाने, शालिग्राम बडगुजर, राकेश गुरव मा.ग्रा.सदस्य शांताराम पाटील, नूतन शिक्षण संस्था संचालक नंदकुमार वाणी, मोतीराम बोरसे, शंकर पाटील, हरचंद वाणी, कथू भोई, अरुण चौधरी, सुनील काटे आदींनी आमदारांचा विशेष सत्कार करत आभार मानले. दरम्यान सदर निधीमुळे या मंदिराचा मोठा विकास साधला जाणार असून यामुळे हे मंदिर भाविकांना आकर्षित करणारे ठरणार आहे.

 

Protected Content