चुंचाळे जि.प. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिपक कोळी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य दिपक कोळी तर उपाध्यक्षपदी लुकमान तडवी यांची निवड करण्यात आली आहे.

चुंचाळे तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ नुकताच संपल्यामुळे कोराना संसर्गाचा प्रभाव लक्षात घेत टप्याटप्याने पालक सभेतून सदस्य निवड आज (दि.३१) रोजी संपन्न झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली त्यात अध्यक्षपदी दिपक कोळी यांना ११ पैकी ९ मते मिळाली त्यांना शाळेचे मुख्यध्यापक गिरीष सपकाळे यांनी विजयी घोषीत करत अध्यक्षपदी निवड केली तर लुकमान तडवी यांची उपाध्यंक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीला समितीचे मावळत्या अध्यक्ष जरीना तडवी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शाल व श्रीफळ देऊन चुंचाळे तंटा मुक्ती अध्यक्ष धनसिंग राजपुत यांनी सत्कार केला. नवनिर्वाचीत सदस्य माधुरी गजरे, राजश्री पाटील, सोनाली पाटील, रजीया तडवी, आरीफा तडवी, अशोक धनगर, सुरेश पाटील, नथ्थु तडवी, अमिर तडवी यांची निवड करण्यात आली. यावेळी इतबार तडवी, भिका तडवी, पप्पु पाटील, रहिमान तडवी, योगेश पाटील, सुकदेव पाटील, इरफान तडवी, मिथून गजरे उपस्थित होते.

निवडणुक प्रक्रियेसाठी मुख्यध्यापक गिरीष सपकाळे यांनी काम पाहिले तर मंजित तडवी, सुरेखा त्रिपाटी, राहुल वाणी, राजु सोनवणे यांनी सहकार्य केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक कोळी यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता शालेय भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न  करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना विसिद्ध शालेय सुविधा पुरविण्याचा सुद्धा त्यांनी मानस व्यक्त केला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!