एनडीए म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’-शशी थरुर

नवी दिल्ली- केंद्र सरकारने संसदेत स्थलांतरित मजूरांपासून ते शेतकरी आत्महत्येपर्यंत अनेक विषयांसंबंधी डेटा उपलब्ध नसल्याचं सांगितले आहे. याचा संदर्भ देत थरुर यांनी एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ असल्याची टीका केली आहे.

शशी थरुर यांनी ट्विटमध्ये ”स्थलांतर केलेल्या मजुरांवर डेटा नाही, शेतकरी आत्महत्येवर डेटा नाही, कोविड मृत्यूंवर संशयास्पद डेटा, जीडीपीवरही गोंधळात टाकणार डेटा… या सरकारने एनडीएला एक वेगळाच अर्थ दिला आहे,” असे नमूद केले आहे. शशी थरुर यांनी ट्विटमध्ये एक कार्टून शेअर केले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन ‘एनडीए’ म्हणजे ‘नो डेटा अव्हेलेबल’ असे सांगताना दाखविण्यात आले आहे.

द्रमुक खासदार कनीमोळी यांनी लॉकडाउनच्या कालावधीत डिजीटल माध्यमांची सोय उपलब्ध नसल्याने नैराश्येतून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भातील माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी केली होती. यावर शिक्षण मंत्रालयाने आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांकडून त्यांच्या प्रदेशात झालेल्या शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील माहिती केंद्र सरकारला पुरवण्यात आलेली नाही असे सरकारने म्हटले होते.

Protected Content