वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका- राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी । आपल्या वाढदिवसाला कुणीही निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आवाहन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्राच्या माध्यमातून केले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी असून दरवर्षी या दिवशी त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र कोरोनाच्या आपत्तीमुळे कुणीही शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे. या संदर्भात जाहीर केलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ”१४ तारखेला माझ्या विढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगली आहे. करोनामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. करोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पादाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी माझा सूचनावजा आदेश आहे की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या. याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या जीवाची काळजी घ्या. तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच.”

Protected Content