Home राजकीय शरद पवार यांच्याकडे ‘हर मर्ज की दवा’ – अब्दुल सत्तार

शरद पवार यांच्याकडे ‘हर मर्ज की दवा’ – अब्दुल सत्तार

0
121


रत्नागिरी – राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. याच सल्ल्यावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांच्याकडे हर मर्ज कि दवा है…असे म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, अशी प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ‘शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है’, असेही सत्तार यावेळी म्हणाले.

राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीवर मार्मिक भाष्य करत शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरेंना टोला मारला. “शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.


Protected Content

Play sound