नव्याने हद्दवाढ झालेल्या विकास कामे लवकरच पुर्ण होणार – अनिता येवले

सावदा प्रतिनिधी ।  सावदा शहराची नव्याने हद्दवाढ झालेल्या परीसरातील विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होणार असून याबाबतच्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक मंजुऱ्‍या मिळाल्या असून काही कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. तर काही कामे ही निविदे प्रक्रियेवर आहे. असे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिता येवले यांनी सांगितले आहे.

या बाबत नगराध्यक्ष अनिता येवले यांनी दिलेल्या माहीतीनुसार, गेल्या दोन वर्षापुर्वी लोकनेत एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याने शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लावला होता. त्याबाबत सावदा नगरपरीषद सर्वसाधारण सभेत सर्वानुमते ठराव झाला होता. त्यानुसार विकास कामाबाबत परीसरातील रस्ते , गटारी व पाणी पाईपलाईन बाबत निविदा प्रक्रिया काढून एका एंजन्सीला याबाबतचे सर्वेक्षण करुन निविदा तयार करण्यात आली. गेल्या महिण्याभरापासून या परीसरातील कामांना काही ठिकाणी सुरुवात झालेली आहे. खाजानगर येथे शुभारंभ सुध्दा झाला असून आता नव्याने हद्दवाढ योजनेअंतर्गत सावदा न.पा. हद्दीतील सोमेश्वर नगर येथील गट नं. ५७५ मधील अंतर्गत रस्त्याचे खडीकरणाच्या १ कोटी १८ लाख ३५ हजार रुपयांच्या कामाना दि.१५ जुलै २०२१ रोजी मान्यता  मिळाली आहे. 

तसेच याच भागात विशेष रस्ता योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून सोमेश्वर मधील गट नं. ५७६ व ५७७ व ५७५ मधील काही भाग अंतर्गत रस्त्याचे खडीकरण साठी १ कोटी १२ लाख ५१ हजार रुपयांच्या कामाना २५ जुलै २०२१ रोजी प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. याबाबत पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून कारवाई सुरु आहे. तसेच सोमेश्वर नगर व पुढील भागातील काही भागामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या ही कमी दाबाचा पुरवठा झाल्यामुळे कधी कधी कमी पाणी पुरवठ्याच्या समस्या उद्भवत असतात त्यासाठी नविन पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे. 

याबाबत सुध्दा आम्हा पाठपुरावा केला असून हे काम मंजुरीधीन आहे. त्याबाबत सुध्दा लवकरच पाठपुरावा करुन पाणी समस्या सुध्दा सुटणार आहेत. तसेच शहरातील काही विकास कामाना सावदा न.पा.कडे सर्व यंत्रणा सक्षम असल्यावर सुध्दा काही कामाना शासनाने सावदा नगरपरिषदेला निधी दिलला नसल्यावर सुध्दा आम्ही जलकुंभ तसेच शादीखाना हॉल व खंडेराव वाडी देवस्थान या कामांना नगरपालिकेन सर्वसाधारण सभेत ठराव घेवून नाहरकत दिलेली आहेत. अश्यारितीने सावदा येथे विविध विकास कामे जसे चांदणी चौक परीसरात व्यापाली संकुल व दत्तमंदीर पाताळगंगा जवळ बगीचा अशी विविध विकास कामे होत आहे.

Protected Content