पहूर येथे केवडेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या केवडेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची आज भव्य महाप्रसादाने सांगता करण्यात आली. 

पहूर पेठ, पहूर कसबे येथुन महादेवाची पिंड, नंदी, घंटा यांची सवाद्य मिरवणूक व नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली. सदर मिरवणूकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते. भगवान भोलेनाथांच्या जय घोषाणे सारा आसमंत दुमदुमला. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीतुन उगम पावलेल्या पुर्वीची व्यासगंगा व आताची वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या केवडेश्वर महादेव मंदिराचा लोकवर्गनीतुन भव्य दिव्य अशा जीर्णोध्दार करण्यात आला. त्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम गेल्या चार दिवसांपासून सुरू होता. महाप्रसादाने सांगता झाली. जीर्णोध्दाराचा व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा केवडेश्वर महादेव मंदिर संस्थान व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाला. आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची ब्रम्हवृंदानच्या  महापुजेने व मंत्रोचाराने विधीवत पुजा होऊन, महाआरती करण्यात आली. यांनतर महाप्रसादास प्रारंभ करण्यात आला. 

पहूर सह परिसरातील पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मठाधिपती प.पु. अलोकनाथ महाराज (श्री. क्षेत्र प.पु.स.रमणनाथजी महाराज संजीवन समाधी देवस्थान मु.पो.तानसा,ता.शहापूर जि. ठाणे(प्रति गाणगापुर)  व  ह. भ. प. महादेव महाराज (निपाणा संस्थान,ता.खामगांव) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर जीर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळा प.पु.सागर प्रमोद कुलकर्णी (नाशिक आणि ब्रम्हवृंद ),प.पु मुकुंद महाराज जोशी, प. पु. हेमंत महाराज जोशी, नंदुमहाराज जोशी, सुभाष महाराज जोशी, धनंजय महाराज कुलकर्णी,मनोज जोशी, किरण जोशी, दिपक भट यांच्या प्रमुख उपस्थितीत   संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी समस्त गावकरी व केवडेश्वर महादेव मंदिर संस्थान चे सर्व पदाधिकारी या सर्वानी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेतला.

 

Protected Content