Home Cities पाचोरा परधाडे सोसायटीत गुरूदास महाजन बिनविरोध

परधाडे सोसायटीत गुरूदास महाजन बिनविरोध

0
35

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील परधाडे सोसायटीच्या पोट निवडणूकीत गुरूदास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर बीजेपी तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

तालुक्यातील परधाडे येथील विविध कार्यकारी विकास सहकारी सोसायटीच्या पोट निवडणुकीत भाजपाचे गुरुदास महाजन यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. यास विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन भागवत पाटील, व्हॉईस चेअरमन सिंधु पाटील, संचालक गोपाल पाटील, नलुबाई पाटील, अशोक पाटील, रामकृष्ण पाटील, अतुल महाजन, मुकेश पाटील, विठ्ठल सोनवणे, लिलाबाई पाटील सह पाचोरा पंचायत समितीची माजी सभापती बन्सीलाल पाटील, भाजपा एकनाथ महाजन, शुभम पाटील, सरपंच सचिन पाटील, रघुनाथ पाटील, सागर पाटील, वसंत पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राऊत तथा सचिव गणेश पाटील, कर्मचारी प्रकाश कोळी यांनी कामकाज पाहिले. या निवडी प्रसंगी भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष युवानेते अमोल शिंदे यांच्यासह मान्यवरांनी गुरुदास महाजन यांचे अभिनंदन केले.


Protected Content

Play sound